
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) 21 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड दौऱ्यावर असणार आहेत. तर ते 23 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्या येथील दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी (intelligence agency) अलर्ट जारी केला आहे.
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल
मोदींच्या जीवाला पाकिस्तानमधील आयएसआय या प्रमुख दहशतवादी संघटनेकडून (ISI) हा धोका असल्याची शक्यता वर्तवली जातेय. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सीमांवर, देशांतर्गत काही ठिकाणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे पुढील काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल.
दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढणार? वाचा सविस्तर
सध्या हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली आहे. तसेच गुजरातमध्ये देखील लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे ते आज डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करतील. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दरम्यान त्यांनंतर पंतप्रधन मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी