स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जयसिंगपूरमध्ये (Jaisingpur) झालेल्या ऊस परिषदेत एक इशारा दिला आहे. ऊस परिषदेत शेट्टी म्हणाले की, एकरकमी एफआरपीसह (FRP) व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसाच्या (sugarcane) कांडाला हात लावू देणार नाही. दरम्यान या मागणीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामध्ये मग आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी आणि शिरगुप्पे शुगर या तिन कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे.
मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर
जयसिंगपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऊस परिषदेत गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, तसेच चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी आणि कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह स्वा13 ठराव मंजूर करण्यात आले होते.
दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर बिबीकरांनी केलं क्रिकेट स्पर्धा (बी.पी.एल)चे नियोजन
दत्तवाडमध्ये रोखली ऊस वाहतूक
आज शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये गुरुदत्त शुगरकडून ऊसतोड करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड करू नये अशी विनंती केली होती. दरम्यान विनंती करूनही ऊस तोड केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ऊस घेऊन गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून मोडतोड केली. यावेळी स्वाभिमानीने जाहीर केलेला दर कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा इशारा दिला.
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस केला डबल
हेरवाडमध्येही ऊस वाहतूक रोखली
तसेच हेरवाडमध्येही दोन दिवसांपूर्वी घोडावत कारखान्याकडून होणारी ऊसतोड बंद पाडली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसतोड करू देणार नाही, असा इशारा यावेळी दिला.
‘या’ जातींच्या भेंडीची करा लागवड, मिळेल भरघोस उत्पादन
औरवाड फाट्याजवळ ट्रॅक्टर अडवला
इतकचं नाही तर औरवाड फाट्याजवळही दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसाला दर देत नाही, तोवर गाडी जाऊ देणार नाही, अशा घोषणा देत ट्रॅक्टर अडवला होता. त्यापूर्वी, घोडावत कारखान्याचीच आळते (ता. हातकंणगले) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरची हवा सोडून देत ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू नये, असा इशारा देत ऊस तोड बंद पाडली होती.
‘या’ जातींच्या भेंडीची करा लागवड, मिळेल भरघोस उत्पादन
पहिली उचल प्रतीटन 3 हजार जाहीर
कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यकडून या चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हसन मुश्रीफ यांनीही एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. परंतु आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून कारखानदार काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात गळीत हंगाम सुरु होणार असल्याने स्वाभिमानीकडून आंदोलन तीव्र केलं जाण्याची शक्यता आहे.