“पोलिस कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस द्या..”, अमित ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलं भावनिक पत्र

Amit Thackeray's emotional letter to Fadnavis, "Give bonus of one salary to police personnel."

मुंबई : दिवाळीचा (Diwali) सण म्हणल की सगळ्याचं नोकरदार वर्गाच बोनसकडे लक्ष लागलेले असते. दरम्यान अशातच अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे राज्यातील पोलिसांसाठी पत्राद्वारे एक मागणी केली आहे. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले की, पोलिसांसाठी दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. म्हणून दिवाळीनिमीत्त राज्यातील पोलिस (Maharashtra police) कर्मचाऱ्यांना एक पगार एवढा बोनस (bonus) द्या अशी मागणी केली आहे.

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ५६ व्या वर्षी केले २३ वर्षीय मुलीशी गुपचूप दुसरं लग्न, कारण…

फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरे म्हणाले की,” गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा राज्यातील पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी आणि पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे पत्र लिहीत अमित ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. चुकीचा सरकारी पायंडा मोडून पोलिसांची दिवाळी गोड करावी यासाठी पोलिसांना बोनस द्या, असे अमित ठाकरे म्हणाले.

मांत्रिकाचा भूत उतरविण्याच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, जे घडलं ते वाचून बसेल धक्का

महाराष्ट्रातील आपले पोलीस बांधव कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात दिवस-रात्र एक करतात. त्यामळे आपल्या सगळेच जन सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन आनंदाचे क्षण अनुभवतो. याच श्रेय जातं याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेला. परंतु याच पोलीस बांधवांना ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात. त्यांना १२ ते १५ तास ड्युटीवर राहावं लागत अस देखील अमित ठाकरे म्हणाले.

आनंदाची बातमी! भीमा पाटस कारखाना होणार लवकरच चालू

पुढे पत्रात लिहिताना अमित ठाकरे म्हणाले की, पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते. इतकंच नाही तर आता दिवाळी साजरी करताना सगळेच जण आपापल्या घरात कंदील आणि पणत्या लावतील त्याचवेळी पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून राज्यभरात गस्त घालत असतील. तसेच कुठे कुणी लहान मुलगा फटाके वाजवताना भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल देखील पोलीस बांधवच करत असतील.

हिरडगाव येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

आपण सगळे विसरून गेलोय की, पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल. त्यामुळे माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला चुकीचा सरकारी पायंडा मोडून पोलिस बांधवांना पुन्हा एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. आणि या पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अस अमित ठाकरे यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

धक्कादायक! फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट, 3 जण ठार तर 7 जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *