मुंबई : परतीच्या पावासाने राज्यात अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांची मान्सून पासून सुटका होणार आहे.
खुशखबर! शेतकऱ्यांना कुट्टी मशिनसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; वाचा सविस्तर
पुढील 48 तासांमध्ये मॉन्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाने (Department of Meteorology) दिली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार “२४ तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रिवादळ निर्माण होणार असून असून २५ तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जाणार आहे”, मात्र या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नसल्याचे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
धक्कादायक घटना, चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू
कोकणचा भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये आज आणि उद्या अशा दोन दिवस पाऊस (Rain) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर पुढच्या दोन दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये ढगाळ वातावरण रहाणार असून हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती