आपण अनेकवेळा प्राणी आणि मानव यांच्यातील जीवापाड मैत्रीचे (friendship) प्रसिद्ध किस्से ऐकले आहेत. दरम्यान अशातच श्रीलंकेतील (Sri Lanka) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील (Sri Lanka) माकड आणि माणूस यांच्यातील दोस्ती पाहिल्यावर असा कोणताच व्यक्ती नाही ज्याचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही. खरतर एक व्यक्ती या माकडाला (Sri Lanka) अनेक दिवसांपासून खायला घालत होती.
भटक्या कुत्र्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
ती व्यक्ती त्या माकडाला खूप जीव लावत होती. काळजी घेत होती. परंतु दुर्दैवाने त्या व्यक्तीचे निधन (death) झाले. त्या दोघांचा एकमेकांवर इतका जीव होता, की तर माकड त्या व्यक्तीच्या मृतदेहापाशी येऊन बसले. दरम्यान माकडाने त्या व्यक्तीच्या डोक्यावर प्रेमाने आपले ओठ टेकवले. त्याच्या अंगावरून हात फिरवला. इतकंच नाही तर अंत्यत्रेसाठी मृतदेह उचलण्यापर्यंत ते माकड त्या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ बसून होते.
T20 World Cup: सुपर 12 चा टप्पा आजपासून सुरू, टीम इंडिया कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार? वाचा सविस्तर
जेव्हा अंत्ययात्रेची तयारी झाली तेव्हा तेथील उपस्थितांनी त्या माकडाला तिथून लांब घालवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण ते माकड काय जायला तयार नव्हते. खरतर त्या बिचाऱ्या माकडाला हे माहीत नव्हते की, आपला अन्नदाता कायमसाठी आपल्यापासून अंतरला आहे.
तरुणांनो मनसोक्त दारु प्या! ‘या’ सरकारचे आगळेवेगळे आवाहन; वाचा सविस्तर