खरतर वेल वर्गीय पिकाची (Veal crop) लागवड यशस्वीपणे करायची असेल तर ती उष्ण व समशितोष्ण हवामानात करावी. याच कारण म्हणजे सूर्यप्रकाश, कमी आर्द्रता (४०-४५ टक्के) आणि रात्रीचे तापमान १८ अंश सेल्सिअस तर दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअस या हवामानात (weather) वेल वर्गीय पिकाचे उत्पादन व फळांची प्रत चांगली मिळते. तसेच वेल वर्गीय पिकाची लागवड (Cultivation) करण्यासाठी तापमान १० ते ३० अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के नियंत्रित असावी. याच उदाहरण म्हणजे पंचतारांकित हॉटेल्समध्ये दर्जेदार वेल वर्गीय फळांना मागणी वर्षभर असल्याने हरितगृहात लागवड किफायतशीर ठरते.
दरम्यान या पिकाचा कालावधी फारच कमी असून तो जातीपरत्वे हंगामाप्रमाणे बदलतो. त्यामुळे सर्वसाधारण थंड हवामानात कालावधी १० ते १५ दिवसांनी लांबतो. त्यामुळे लागवड जरी वर्षभर करता येत असली, तरी पावसाळ्यातील (जून-जुलै) लागवड उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर ठरते. त्यामुळे जर हिवाळ्यात लागवड केल्यास वाढीचा कालावधी लांबल्यामुळे उत्पादन नेहमीपेक्षा १०-१५ दिवसांनी पुढे जाते.
दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ
महत्वाची बाब म्हणजे उन्हाळ्यातील लागवड ही हिवाळी हंगामापेक्षा नक्कीच किफायतशीर ठरते. परंतु पाण्याचा ताण पिकास मानवत नाही. तसेच हरितगृहातील नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमध्ये लागवड केल्यास याचा फायदा असा की वर्षभर लागवड करणे शक्य होऊन फळांची प्रत व उत्पादनामध्ये वाढ होते. महत्वाची बाब म्हणजे खुल्या शेतीसाठी हंगामाप्रमाणे मग यामध्ये हिवाळी, पावसाळी व उन्हाळी अशा पद्धतीने वेल वर्गीय पिकांच्या जातींची निवड करावी.