मुंबई : सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्येष्ठांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. त्यातच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात पक्ष वर्चस्वावरून संघर्ष चालू असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांची भेटी घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी दुसरी भेट राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली. तसेच टाटा उद्योग समूहाचे सर्व सर्वे रतन टाटा यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.मनोहर जोशी यांना भेटून आल्यानंतर भेटीचे नेमके कारण त्यांनी माध्यमांना सांगितले. “भेटी मागे कोणताही राजकीय हेतू नाही. पुढील वाटचालीस ज्येष्ठ आणि वरिष्ठांचे आशीर्वाद मिळावेत या उद्देशाने मी मनोहर जोशी यांची भेट घेतली”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
“मनोहर जोशी यांनी त्यांच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले काम केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून आता मी त्यांचीभेट घेतली. शिवसेना पक्ष वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे व बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या बरोबर देखील त्यांनी काम केल आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन पुढील वाटचालीस कामी येणार आहे”. असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ६० विविध योजनांची घोषणा केली होती. त्यांनी मला या योजनेचे पुस्तक देखील भेट दिले आहे. या योजना तुम्ही राबवा. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी भावना मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.
ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच हवे असतात. या सरकारच्या माध्यमातून आम्हाला चांगले काम करून राज्याचा विकास करायचा आहे. जनतेच्या हिताच्या योजना राबवायच्या आहे. योजना तळघळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी आम्हाला काम करायचे आहे. या भेटीमध्ये कोणताही राजकीय हेतू नाही . ते आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आम्ही त्यांच्या हाताखाली काम देखील केलेले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले.