देशात सगळीकडेच यावर्षी कोरोनाच संकट दूर झाल्याने जोरदार आणि उत्साहात दिवाळी (Diwali Festival) साजरी केली जात आहे. दिवाळी हा सण असा आहे की सर्वचजण आपल्या गावी जाऊन, कुटुंबासोबत (Family) दिवाळी साजरी करतात. दिवाळीचा फराळ करतात, फटाके वाजवतात. तर दुसरीकडे आपल्या भारत देशाच्या सीमेवरील वीर जवान (soldier) आपल्या देशवासीयांना आनंदात सण-उत्सव साजरे करता यावा यासाठी कुटुंबापासून दूर राहून ते आपल्या भारत देशाचे रक्षण (Protecting the country) करत आहेत.
कांदा दरवाढीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह, सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा पण शेतकरी बंधूंना बसू शकतो फटका
विशेष म्हणजे हे वीर जवान सीमेवरच म्हणजेच आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत. दिवाळी नुसती साजरीच नाही तर याशिवाय या जवानांनी देशवासीयांना, “आम्ही आहोत, तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा; जवानाचा अभिमानास्पद संदेशही दिला आहे.
मोठी बातमी! फटाका स्टॉलला आग लागून दोघांचा मृत्यू
दरम्यान काल रात्री (शनिवार) नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनीही दिवाळीनिमित्त दिवे लावून दिवाळी सण साजरा केला. यावेळी या वीर जवानांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत जवान म्हणाले की, “आम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहोत.तसेच तुम्ही नि:शंकपणे दिवाळी साजरी करा, असा संदेशही दिला आहे. इतकंच नाही तर यावेळी जवानांनी याप्रसंगी फटाकेही फोडले.
Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नल इक्बाल सिंह यांनी म्हटले की, “मी देशवासीयांना सांगू इच्छितो की चिंता करू नका आणि आनंदात दिवाळीचा सण साजरा करा. मी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमचे सैनिक सतर्क आहेत आणि सीमेवर लक्ष ठेवून आहेत.”
वेलवर्गीय पिकांमधून जास्त उत्पादन हवयं, तर ‘अशी’ घ्यावी काळजी