मागील काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने (the return rain) थैमान घातले आहे. इतकंच नाही तर हाता तोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. तसेच काही भागात तर मुसळधार पावसाने शेतात (the field) पाणी साचले. दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर हे आर्थिक संकट आल्याने त्यांना दिवाळी (Diwali) देखील साजरी करता येतं नाही.
कांदा दरवाढीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह, सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा पण शेतकरी बंधूंना बसू शकतो फटका
दरम्यान अशातच सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आपली व्यथा सांगताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमधून त्या चिमुकल्याने दिवाळीत कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत. तसेच यासह इतर अनेक व्यथा मांडल्या आहेत.
मोठी बातमी! फटाका स्टॉलला आग लागून दोघांचा मृत्यू
हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आलं असेल.इतकंच नाही तर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) त्या चिमुकल्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. अन् त्या लहान मुलाची दिवाळी उद्धव ठाकरेंनी गोड केली.
Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO
ऋषिकेशसोबत बोलताना ठाकरे म्हणाले की, “काळजी करू नकोस आपण सर्व एकत्र आहोत. धीर सोडू नका, जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही करणार आहोत”. तुम्ही संकटातून जात आहात आणि आम्ही देखील एका वेगळ्या लढाईत आहोत, अस ठाकरे म्हणाले.
साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा
दरम्यान, उद्धव ठाकरेंनंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील चव्हाण कुटुंबाची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी चव्हाण कुटुंबियांना आर्थिक मदतही केली. इतकंच नाही तर खैरे यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी देखील शिंदे सरकारकडे केली.
रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल