भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची भलतीच रडारड सुरू, ट्विटरवर #Cheating असा हॅशटॅग केला व्हायरल

After the defeat by India, Pakistan's radar started, the hashtag #Cheating went viral on Twitter.

मुंबई : काल 23 ऑक्टोबर रोजी (रविवारी) टी-20 विश्वचषक सुपर-12 हा सामना भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन देशांमध्ये झाला. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीने भारताने शानदार विजय (Win) मिळवला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या या अभूतपूर्व विजयावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान असं असतानाच पाकिस्तानने मात्र भलतीच रडारड सुरू केली आहे.

आता दिवाळीत फटाक्यांचा ‘आवाज’ नियंत्रणात राहणार, वाचा सविस्तर

कालच्या सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवांनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या समर्थकांकडून (Pakistani supporters) ट्विटरवर #Cheating असा हॅशटॅग व्हायरल(Hashtag viral) करण्यात येत आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानी चाहत्यांनी सर्व पंच हिंदुस्थानच्या बाजूने खेळत होते असे म्हणत ट्रोलिंग सुरु केले आहे. आपण व्हायरल ट्विटमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटर नासिर हुसेन यांनीसुद्धा टीम इंडियावर आरोप लगावल्याचा दावा केला आहे.

बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये

काल झालेल्या या रोमहर्षक लढतीत भारताने टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत विजयासह प्रवासाला सुरुवात केली. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. 31 धावांच्या बेरजेवर 4 मोठे विकेट गमावले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या जोडीने भारतीय संघाची धुरा सांभाळत विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

धक्कादायक! नातेवाईकानीच चार वर्षांच्या मुलाची अपहरण करून केली हत्या

विराट कोहलीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत पाकिस्तानविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विजय पटकावला. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने आपल्या विजयी खेळीत 6 चौकार आणि 4 बहिरे षटकार मारले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामना संपल्यानंतर कोहली म्हणाला, ‘हे कसे घडले ते मला माहित नाही, भावना वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

दारूच व्यसन आल अंगलट, 10 रुपये कमी पडले म्हणून पठ्ठ्यानं चक्क मालकासहित दुकानाच पेटवलं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *