
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान अशातच पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील (Velhe taluka) एक शेतकरी त्याच्या सर्जा (Sarja) नावाच्या दरीत पडलेल्या बैलासाठी (bull) दिवाळीचा सण विसरून गेला आहे. दरम्यान या घटनेची माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना मिळाली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले. दरम्यान चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सर्जाला बाहेर काढण्यात यश आले.
मोठी बातमी! अंध मुलांच्या शाळेला आग लागून ११ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
नेमकी घटना काय घडली ?
वेल्हे तालुक्यातील दापोडे या गावातील विजय शेंडकर या शेतकऱ्याने आपला सर्जा नावाचा बैल चरण्यासाठी बाहेर सोडला होता. दरम्यान दोन-तीन दिवस झाले तरी आपला सर्जा बैल घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी काळजीपोटी रांजणे डोंगरावर शोध घेतला. दरम्यान यावेळी सर्जा बैल खोल दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेतकऱ्याने बैलाच्या काळजीपोटी त्या खोल दरीत दोर लावून खाली उतरत बैलाला जमेल तितका चारा-पाणी पोहचविण्याचा प्रयत्न केला.
WhatsApp: “…क्या गुंडा बनेगा रे तु?” व्हॉट्सअॅप डाऊन होताच ट्विटरवर मिम्सचा पडला पाऊस
परंतु सर्जाला अशक्तपणा आला होता. त्यानंतर हवालदिल झालेल्या या दरम्यान, सर्जाला अशक्तपणा आला होता. यानंतर कुटुंबीयांनी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर यांच्यामार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती सुप्रिया सुळे यांना दिली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला.
बिर्याणीतील मसाल्यामुळे होतय पौरुषत्व कमी, TMC च्या ‘या’ नेत्याचा आगळावेगळा दावा
दरम्यान, मुळशी तालुक्यातील भूगाव येथील रेस्क्यू टीमचे 10 सदस्य रविवारी (23 ऑक्टोबर) घटनास्थळी दाखल झाले. या रेस्क्यू पथकातील सुमीत तरडे, चांडक, श्रेयश दुधगावकर, नागरे, तेजाब शेख, प्रद्युम्न सिंग, विकास सिंग, यांच्यासह काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवराज शेंडकर, दापोडे गावातील ग्रामस्थांनी 24 तास खूप प्रयत्न केले. दरम्यान अखेर या 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जाला वाचवण्यात यश आले. दरीतून बाहेर काढल्यानंतर सर्जा उपचाराला प्रतिसाद देत आहे.
WhatsApp: व्हॉट्सअॅपची सेवा सुरु, नेमकी का बंद होती सेवा? वाचा सविस्तर