आपण नेहमी पाहतो की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) वेगवेगळ्या योजना राबवत असते. विशेष म्हणजे या योजनांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो. दरम्यान आता शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीक विमा योजना राबविली जात आहे.
काय सांगता! अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधले तेल घेण्यासाठी गरीबांची धावपळ, समोर आल कारण
नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिलेल्या महितीनुसार, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे या जिल्ह्यातील 717 कोटी 88 लाख रुपयांचा निधी वितरण्यास सुरुवात केला आहे. अतिवृष्टीचा फटका तब्बल 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना बसला. यात 5 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले.
‘देव तारी त्याला कोण मारी’, अखेर 25 दिवसांनंतर खोल दरीत अडकलेल्या बैलाला वाचविण्यात यश
पुढे रविशंकर चलवदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 717 कोटी 8 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. हा निधी शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. हा निधी जिल्हा बँकेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इतकंच नाही तर नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच 8 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्याच्या अगोदर निधी (fund) मिळाला असल्याचं रविशंकर चलवदे म्हणाले.
बिर्याणीतील मसाल्यामुळे होतय पौरुषत्व कमी, TMC च्या ‘या’ नेत्याचा आगळावेगळा दावा