आज आपण मुरघासाचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत तत्पूर्वी मुरघास कसा असावा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात… प्रथम आपण मुरघासाचे तोटे पाहुयात मुरघास तयार झाल्यानंतर तो कसा तयार झाला आहे हे पाहावे बॅग ओपन केल्यानंतर त्याच्या वरील थरामध्ये कधीकधी बुरशी लागलेला मुरघास पाहायला मिळतो असा मुरघास काढून फेकून द्यावा तसेच बॅग मधून मुरघास काढत असताना मध्येच बुरशी, काळा पडणे, चिकटपणा असणे असा मुरघास काढून फेकून द्यावा त्याचा चारा म्हणून वापर करू नये या बुरशी लागलेल्या मुरघासामुळे आपल्या पशुचे आरोग्य बिघडते त्यामुळे असा मुरघास पशूंना खायला घालू नये. चांगला मुरघास हा सुटसुटीत व ब्राऊन कलर म्हणजेच तपकिरी रंगाचा होतो. तसेच त्याचा वासही चांगला येतो. हाच मुरघास आपल्या पशुंसाठी योग्य असतो.
आपण बनवलेला मुरघास हा चांगल्या प्रतीचा तयार झालेला असेल तरच, त्या मुरघासाचे फायदे आपल्याला दिसून येतात. जर मुरघास खराब असल्यास तो जनावरांना देऊ नये. यामुळे आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे मुरघास तयार झाल्यानंतर तो चांगल्या प्रतीचा आहे का याची खात्री झाल्यानंतरच त्याचा वापर करावा. मुरघास तयार झाल्यानंतर तो वापरण्यापूर्वी मोकळ्या हवेत थोडावेळ पसरवून ठेवणे गरजेचे असते त्यानंतरच तो जनावरांना देणे.
जाणून घेऊयात मुरघासाचे महत्त्व आणि फायदे
सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मुरघासामध्ये पोषणमूल्य जास्त प्रमाणात असल्याने गाई म्हशींना आवश्यक असणारे पोषणमूल्य मूरघासातून जास्त प्रमाणात भेटतात. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. त्याचबरोबर तुमचा पशुखाद्याचा वापर कमी होऊन खर्च ही कमी करता येऊ शकतो. साहजिकच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते.
दुसरा फायदा म्हणजे हिरवा चारा दीर्घकाळ टिकवून ठेवणे. परंतु त्यातील पोषणमूल्य आहे तशीच टिकून राहिली पाहिजे त्यासाठी मुरघास ही पद्धत योग्य असते
त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याला वाळवून सुद्धा दीर्घकाळ साठवता येते परंतु त्यातील पोषणमूल्य नष्ट होणे किंवा त्यांचे प्रमाण कमी होते. यामुळे जनावरांना पोषक असा चारा मिळत नाही.
हिरवा चारा दीर्घकाळ टिकवण्यासाठी हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्याचा मुरघास बनवल्यास त्यातील पोषणमूल्य म्हणजे, विटामिन्स प्रथिने ही पोषण मूल्य आहे त्याच प्रमाणात टिकून राहतात.
मुरघासामधील जिवाणू, आम्ल हे जनावरांच्या पोटातील जीवाणू आणि आम्ल यांच्याशी साम्य असतात. त्यामुळे जनावरांना पचण्यास चांगला असतो सहाजिकच यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची दूध उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
मुरघासामध्ये विटामिन्स प्रथिने इत्यादी पोषणमूल्य जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा दूध उत्पादनात देखील चांगला परिणाम दिसून येतो गाई म्हशींच्या दुधामध्ये चांगली वाढ होते तर नुसतीच दूध उत्पादनात वाढ होत नसून त्या दुधाची प्रतही चांगल्या प्रकारची असते. दुधाची फॅट व एस एन एफ वाढण्यास मदत होते.
मुरघास दीर्घकाळ टिकत असल्यामुळे तो आपण बाराही महिने वापरू शकतो त्यामुळे आपल्याला गाई म्हशींना वर्षभर चांगल्या प्रतीचा किंवा चांगल्या प्रकारचा चारा देता येऊ शकतो किंवा तुमच्याकडील इतर चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार तसेच पावसाळ्यामध्ये चारा कापणी करताना येणाऱ्या अडचणी अशावेळी देखील तुम्ही मुरघासाचा वापर करू शकता.
साधारणपणे शेतकरी हिरव्या चाऱ्याचे नियोजन करताना तो उपलब्धतेनुसार वापर करतात यामध्ये मका कडवळ उसाचे वाडे किंवा भुईमुगाचा पाला, वाळलेला ज्वारीचा कडबा इत्यादी चारा त्याच्या उपलब्धतेनुसार वापरत असतात. परंतु यामध्ये सातत्याने एकसारखा चारा उपलब्ध होत नसतो साहजिकच याचा परिणाम दूध उत्पादनावरती होतो. जर आपल्याला सातत्याने एकसारखा चारा द्यायचा असेल तर त्याला मुरघास हा चांगला पर्याय आहे. यामुळे चाऱ्यातील सातत्य टिकून उत्पादनात देखील सातत्य ठेवता येते
आणखी एक फायदा म्हणजे जर शेतकऱ्यांनी एक एकर मका केली असेल तर ती मका पूर्ण पक्व होण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा वेळ जातो. परंतु तीच मका जर आपण चिकाऱ्यांमध्ये म्हणजेच अडीच-तीन महिन्याची असताना त्याचा मुरघास बनवला तर, आपला पूर्ण प्लॉट एकदाच कापणी होऊन तो रिकामा होऊ शकतो. परिणामी शेतीची मशागत करण्यासाठी वेळ मिळतो आणि दुसरे पीक घेण्यासाठी आपले शेत लवकर तयार करू शकतो.
एकंदरीत पाहता शेतकऱ्यांना चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन करताना मुरघासामुळे वेळेची ही बचत करता येते. कारण चारा नियोजन करताना आपल्याला रोज त्याची कापणी करून आणावी लागते मुरघास केल्याने आपल्याला रोज रोज चारा कापणी करण्याची गरज पडत नाही, म्हणून मुरघास करून तो आपल्या जनावरांना वापरणे फायदेशीर ठरताना दिसत आहे.