मुंबई : मुंबईतील गिरगावमध्ये बुधवारी भीषण आग (fire) लागली. या आगीमध्ये १४ गाड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. जळालेल्या गाड्यांमध्ये सात दुचाकी तर सहा चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. गोदामात ही आग लागली असून बाहेर उभा असलेल्या गाड्या जाळल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग खूप भीषण होती. अवघ्या काही वेळातच सगळीकडे पसरली. रुंद रस्ता असल्याने अग्निशमन (fire fighting) दलाला घटनास्थळी पोहोचण्यास देखील उशीर झाला. दरम्यान, ही आग पाच टँकरच्या मदतीने विझवण्यात आली आहे.
खुशखबर! आता आधार कार्डद्वारे देशभरात कुठेही घेता येणार रेशन कार्डवरील धान्य, वाचा सविस्तर माहिती
या आगीमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मागच्या अनेक वर्षांपासून हे गोदाम बंद आहे तरी देखील आग कशी लागली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फटाक्यांमुळे ही आग लागली असण्याचाही शक्यता वर्तवली जात आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
नेमकं मुरघासाचे फायदे आणि तोटे कोणते? वाचा याबद्दल साविसर माहिती