मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय चर्चांना उधाण आले होते. याच कारणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला आहे. “पक्षप्रमुख हा उल्लेख टाळणे हा क्रूरपणा आहे”. असे संजय राऊत बोलले.
पक्षप्रमुख हा उल्लेख टाळणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही क्रूरपणा आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहेत. मात्र यांच्या मनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल द्वेष आहे. हा द्वेष राज्याच्या आणि शिवसैनिकाच्या मनात नाही. शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस काल अख्या महाराष्ट्रत साजरा केला. शिवसेना काय आहे शिवसेना कोणा बरोबर आहे आता हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी 27 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा ट्विटद्वारे दिल्या होत्या. यातच त्यांनी त्या ट्विट मध्ये माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता व पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला होता. याबाबत बंडखोर गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आले यावेळी ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर मी काहीही बोलू शकत नाही.