
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रचाळ घोटाळा प्रकरणी 8 ऑगस्ट पर्यंत ईडी ची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्यांची पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना देखील समन्स बजावले आहे. त्यानुसार आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी 11 वाजेपर्यंत संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत असा आरोप ईडीने केला आहे. वर्षा राऊत यांच्या नावावर अज्ञात व्यक्तींकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकरणासाठी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. याआधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती.