मागील काही दिवसांपासून ऊस दरावरून (sugarcane rate) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Farmers Association) आंदोलन सुरू आहे. दरम्यान सध्या कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आंदोलन (movement) सुरू असतानाच आता आसुर्ले-पोर्ले ता.पन्हाळा येथील दत्त दालमिया भारत साखर कारखान्याने (Dalmia India Sugar Factory) पहिल्या उचलीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, ‘या’ सरकारने नवविवाहीत महिलांना विचारला आगळाववेगळा प्रश्न; वाचा सविस्तर
दरम्यान आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्यात ऊस दराबाबत चर्चा झाली. फक्त चर्चाच झाली नाही तर एफआरपीची पहिली उचल ३१०० रूपये घोषित केली गेली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
“वयोमानुसार त्यांनी वक्तव्य केली पाहिजे…” , रावसाहेब दानवेंनी आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा
यंदाच्या गळीत हंगामासाठी दालमिया शुगरने पहिली उचल ३०७५ जाहिर केली होती. दरम्यान याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने दालमिया शुगर कारखान्याची ऊस वाहतुक बंद केली होती. इतकंच नाही तर शेतकरी संघटनेने यावेळी आंदोलन तीव्र केले होते. दरम्यान या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गेट समोर आडवले.
इतकंच नाही तर त्या पाच वाहनांना परत पाठवले. तसेच एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये असे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते. यामुळे यावर तोडगा निघणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्या गेट समोर साखर वाटून आनंद साजरा केला.