मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महत्वाचं म्हणजे वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. तिच्या या विधानामुळे ती चर्चेत आली आहे.
बिग ब्रेकिंग! ‘या’ तणनाशकावर बंदी; शेतकरी झाले नाराज.. नेमकं काय आहे कारण?
कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असून तिने तिच्या आवडीचा लोकसभा मतदारसंघ देखील सांगितला आहे. तिच्या राजकीय प्रवेशासंदर्भातलं हे मोठं वक्तव्य ठरु शकतं. कंगना म्हणाली, ” मला २०२४मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवायला आवडेल”
धक्कादायक! कुळधरणमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
कंगनाने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली यावेळी तिने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं कौतुकही केलं. आपला कोणीच विरोधक नाही हे मोदींना माहिती आहे. राहुल गांधी यांचा सामना हा राहुल गांधींशीच आहे. त्यामुळे मोदींना कणखर विरोधक नाही, असं देखील कंगना यावेळी म्हणाली.