सध्या तरुणांमध्ये एकच नाव आपल्या ऐकायला मिळत आहे ते म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). पण तरुणाईला वेड लावणारी ही गौतमी पाटील नक्की आहे तरी कोण? आजच्या लेखामध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?
गौतमी पाटील मुळची कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आहे. ही गौतमी गाण्यांवर बेभान होऊन डान्स करत असल्याचं दिसत आहे. गौतमीच्या डान्सने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. गौतमीला अनेक कार्यक्रमामध्ये डान्स करण्यासाठी बोलवलं जातं, आणि त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात मानधन देखील दिलं जातं.
गौतमी पाटील मूळची कोल्हापूरची असून ती २६ वर्षांची आहे. पण या व्यतिरिक्त तरी तिचं गाव, शिक्षण, तिचे आई-वडिल, याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
Google: गूगल सर्च करणं महिलेला पडलं महागात, तुम्हीही गुगलवर ‘ही’ गोष्ट सर्च करताय? तर सावधान
गौतमी पाटीलला डान्स करताना तिच्या इशाऱ्यांमुळे, हावभावांमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मागच्या काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. गौतमीने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी गाण्यावर विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून डान्स केला होता. यानंतर तिला ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. त्यानंतर गौतमीने सर्वांची माफी देखील मागीतली होती.