पुणे : मान्सूनच्या माघारीसोबतच हिवाळा (Winter) सुरू होऊन हळूहळू थंडी पडायला सुरवात होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात (temperature) सातत्याने घट होत आहे. दरम्यान परतीचा पाऊस (Return rain) थांबून एक आठवडा झाल्यानंतर लगेच पुण्यात (Pune) थंडीचा कडाका वाढला आहे. महत्वाची बाब म्हणजे शनिवारी रात्री पुणे शहरात किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर उत्तर भारतात सुरू झालेली बर्फवृष्टी आणि राजस्थान मधून येणारे थंड वारे यामुळे पुण्यासह राज्यातील तापमानात घट होत आहे.
Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?
खरतर दिवाळीनंतर थंडीला (the cold) सुरुवात होत असते. परंतु येत्या काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा आढावा घेतला असता पुणे शहरात १९६८ मध्ये तापमान ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते. त्यानंतर यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसांत १२.६ अंश सेल्सिअर तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी परतीच्या पावसाने विलंब केल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर पाऊस थांबल्यानंतर एकाच आठवड्यात थंडीचा कडाका वाढलाय.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर
तसेच परतीचा पाऊस लांबल्याने रब्बचा हंगाम एका महिन्यानी लांबला आहे. इतकंच नव्हे तर वापसा नसल्याने अनेक ठिकाणी रब्बीच्या पिकांची पेरणी झाली नाही. तसेच पेरणी झाल्यानंतर पिकांना जमिनीतून वर येण्यासाठी उबदारपणा आवश्यक असतो. पण आता थंडीमुळे तोच मिळत नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.दरम्यान शेवटच्या सत्रात पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Google: गूगल सर्च करणं महिलेला पडलं महागात, तुम्हीही गुगलवर ‘ही’ गोष्ट सर्च करताय? तर सावधान