मुंबई : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. आज संसद भवनातीन मतदान केंद्रावर राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदार मतदानासाठी येत आहेत. नरेंद्र मोदींनी (Narendr Modi) देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतदान करण्यास सुरवात झाली आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड आणि काँग्रेसकडून मार्गारेट अल्वा या दोघांमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. जगदीप धनखड यांना जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत गैरहजर
शिवसेनेचे खासदार याना पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत असल्यामुळे ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला गैरहजर राहणार आहेत.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 780 खासदार मतदान करणार आहेत. आज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत उपराष्ट्रपती पदासाठीचे मतदान प्रक्रिया पार पडेल. 5 वाजेनंतर मतमोजणी सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.