आज मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय, पोलिसांसह शासकीय मेगाभरतीसाठी वाढणार वयोमर्यादा

A big decision will be taken in the cabinet today, the age limit will be increased for government mega recruitment including police

मागील दोन वर्षात कोरोणामुळे पोलिस भरतीसह (police conscription) अन्य शासकीय नोकरभरती (Government Recruitment) राबविण्यात आली नाही. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरूणांची वयोमर्यादा (age limit) संपुष्टात आली. इतकंच नाही तर काही तरुण वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांना आता भरतीत सहभागी होता येणार नाही. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता तरूणांची पोलिस भरतीसाठी दोन ते तीन वर्षांनी वयोमर्यादा वाढणार आहे. आज (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीत निर्णय होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

केंद्र सरकारकडून पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, पाच हजार रोजगार निर्मितीचा केला दावा

आता राज्यात एकाचवेळी 14 हजार 956 पदांची पोलिस भरती होणार आहे. दरम्यान या पोलीसभरतीसाठी अर्ज भरण्यास 3 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार होता. पण आता नोव्हेंबरअखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. म्हणून राज्यातील लाखो तरूणांची नोकर भरतीत सहभागी होण्याची वयोमर्यादा संपली. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुध्दा तरूणांची वयोमर्यादा आणि त्यांना संधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता.

Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

याच पार्श्वभूमीवर गृह व सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी आता राज्यातील क व ड संवर्गातील नोकर भरतीत तरूणांना वाढीव संधी किंवा वयोमर्यादा वाढवून मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अनेक सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी वयोमर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील लाखो तरूणांना नोकर भरतीत वयोमर्यादा वाढवून दिलासा देईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

“..अरे, ही तर पापा की परी”, तरुणीची उभ्या ट्रकला स्कूटीची जोरदार धडक, व्हिडिओ व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *