![The famous hotel 'Ya' in Pune was severely damaged by fire](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/10/Gas-2.jpg)
पुणे (Pune) शहरातील कोंढवा येथील लुल्ला नगर (Lulla Nagar) परिसरात आगीची (Fire) मोठी दुर्घटना घडली आहे. लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या मार्वल विस्टा बिल्डिंगच्या (Marvel Vista Building) सातव्या मजल्यावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमधील वरच्या मजल्यांवरून धूर (the smoke) निघत असल्याचं निवासी नागरिकांना दिसलं. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आज मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय, पोलिसांसह शासकीय मेगाभरतीसाठी वाढणार वयोमर्यादा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ही आग आज सकाळी आग लागली. दरम्यान या आगीने काही क्षणात रौद्ररुपधारक केले आहे. इतकंच नाही तर आगीचे लोण पसरत चालले असून दूरपर्यंत धूर दिसून येत आहे. तसेच हॉटेलला आग लागल्यानंतर तेथील सिलेंडर स्फोटाचेही आवाज येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या आहेत.
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! आता प्रवाशांना लगेचच समजणार बसचे शेवटचे लोकेशन काय आहे
आग विझवण्याचे काम सुरू आहे. या हॉटेलला आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी वा जीवितहानी झाली नसल्याचे समजते.
बापरे! गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावेळी गर्दीत चेंगरून एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर