नव्या लूकमुळे कतरिना झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी दिल्या एकशे एक कमेंट्स

Katrina got trolled due to her new look, netizens gave one hundred and one comments

कतरिना कैफला (Katrina Kaif) बॉलिवूड अभिनेत्रींमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखले जाते. कतरिना ही नेहमी विविध कारणांमुळे आणि तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. दरम्यान सध्या कतरिना कैफ ही तिच्या आगामी चित्रपट ‘फोन भूत’ (Phone Bhoot movie) मुळे चर्चेत आहे. तसेच येत्या 4 नोव्हेंबरला फोन भूत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कतरिनाचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट असणार आहे.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! आता प्रवाशांना लगेचच समजणार बसचे शेवटचे लोकेशन काय आहे

त्यामुळे प्रेक्षक तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महत्वाची बाब म्हणजे फोन भूत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे कतरिना दरवेळी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या लूकमध्ये (new look) येत आहे. परंतु अनेकजण आता तिच्या दिसण्यावरून तिला खूप ट्रोल (trol) करत आहेत.

बापरे! गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावेळी गर्दीत चेंगरून एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर

दरम्यान अशाच एका प्रमोशन दरम्यानचा कतरिनाचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. कतरिनाचा हा नावा लूक नेटकऱ्यांना अजिबात आवडलेला नाहीये. त्यामुळे नेटकऱ्यांनी कतरिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या फोटोतून कतरिनाने काही वर्षांपूर्वी प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नेटकऱ्यांच अस म्हणन आहे की, सर्जरी केल्यानंतर कतरिनाचा चेहरा आणखीनच बिघडला आहे.

आज मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय, पोलिसांसह शासकीय मेगाभरतीसाठी वाढणार वयोमर्यादा

नेटकऱ्याने सोशल मीडियावर कतरिनाचा काही वर्षांपूर्वीचा आणि आताचा असे दोन फोटो कोलाज करून पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना कॅप्शन देत लिहिले आहे की, “कतरिनाला सगळे बार्बी डॉल म्हणतात आणि ते खरतर बरोबरच आहे. कारण आता प्लॅस्टिक सर्जरी केल्यावर तिचा चेहरा आणखीनच चमत्कारिक दिसू लागला आहे. पण तिने का ही सर्जरी केली…”

जनतेला महागाईपासून मिळाला दिलासा, आता ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *