बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगावराजा या ठिकाणी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सध्या नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळीनिमित्त घरात नवीन कार आल्याने एक महिला आपल्या मुलीसह गाडी शिकत होती. पण गाडी शिकत असताना दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोरांना नादी लावणाऱ्या गौतमीने आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी; वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगावराजातील रामनगरमध्ये शिक्षक अमोल मुरकुटे हे आपल्या पत्नीला कार शिकवत होते यावेळी त्यांची मुलगी देखील कारमध्ये बसली होती. त्यामुळे त्या चिमुकलीचा देखील मृत्यू झाला आहे.
सोमेश्वर कॉलेजला दिलेले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याची मागणी; शेतकरी कृती समितीने घेतला आक्षेप
घटना अशी घडली की, अमोल हे पत्नीला कार शिकवत होते. यावेळी रोडवर कारचा ताबा सुटून ती कार थेट ७० फुट खोल विहिरीत कोसळली.यावेळी अमोल गाडीच्या खिडकीतून बाहेर आले. त्यांची पत्नी आणि मुलीलामात्र कारमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दोघी मायलेकींचा तिथेच मृत्यू झाला.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ खतांवर मिळणार अनुदान; वाचा सविस्तर
या अपघातामध्ये अमोल मुरकुटे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; वाचा सविस्तर