मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतले (बॉलिवूड) कलाकार आजकाल मराठी चित्रपटांमध्ये देखील झळकत आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
सोमेश्वर कॉलेजला दिलेले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याची मागणी; शेतकरी कृती समितीने घेतला आक्षेप
‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ चित्रपटामधून पहिल्यांदाच अक्षय कुमार मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आग्रहास्तव अक्षय कुमारने ही भूमिका केली असल्याचे सांगितले जात आहे.
पत्नीला कार शिकवण्याचा नादात शिक्षकाचा संसार उध्वस्त! कार विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
या चित्रपटाच्या लॉन्चिंग दरम्यान शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल बोलताना, “एवढी दिग्गज भूमिका साकारणे ही खरोखरच मोठी जबाबदारी आहे. ही भूमिका साकारताना मला खूप भारी वाटत आहे. माझ्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका असणार आहे.” असे उद्गार अक्षय कुमारने ( Akshy Kumar ) काढले.
पोरांना नादी लावणाऱ्या गौतमीने आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी; वाचा सविस्तर
‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर देखील दिसणार आहे. यामध्ये तो ‘दत्ताजी पागे’ यांची भूमिका पार पाडणार आहे. याशिवाय बिग बॉस मराठी फेम जय दुधाने, उत्कर्ष शिंदे आणि विशाल हे या चित्रपटात दिसणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ खतांवर मिळणार अनुदान; वाचा सविस्तर