इन्स्टाग्राम हे तरुणाईचे सर्वात आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. मेटाच्या इतर प्लॅटफॉर्म्स पेक्षा इन्स्टाग्राम ला सर्वाधिक पसंती आहे. याचे जगभरात लाखो वापरकर्ते पहायला मिळतात. सतत होणारे बदल आणि आकर्षक मांडणी यामुळे इन्स्टाग्रामकडे दिवसेंदिवस अधिक वापरकर्ते आकर्षित होत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामने नुकत्याच काही नवीन फीचर्स बद्दल माहिती दिली आहे.
पत्नीला कार शिकवण्याचा नादात शिक्षकाचा संसार उध्वस्त! कार विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
माहितीनुसार, इन्स्टाग्राम प्रोफाइलवर गाणे ॲड करता येणे, स्टोरीवर स्टिकर्स वापारता येणे हे फीचर्स लवकरच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे युजर्सचे इन्स्टाग्राम प्रोफाइल अधिक आकर्षक होणार आहे. यासोबतच इन्स्टाग्रामने वेब स्क्रीन रीडीजाईन केली आहे. यात खालील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
सोमेश्वर कॉलेजला दिलेले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याची मागणी; शेतकरी कृती समितीने घेतला आक्षेप
1) नवीन इंटरफेसमध्ये उजवीकडे असणारे पॅनल डावीकडे दिसेल.
2) यामध्ये डीएम, एक्सप्लोर, नोटीफीकेशन, न्यू पोस्ट अशा टूल्स उपलब्ध होतील.
3) तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आयकॉन आणि टेक्स्ट पॅनलवर समाविष्ट करण्यात आले आहेत.
या बदलांमुळे मोठ्या स्क्रीनवर इन्स्टाग्राम वापरणाऱ्या वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वापरणे आणखी सोयीचे होणार आहे.
पोरांना नादी लावणाऱ्या गौतमीने आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी; वाचा सविस्तर