भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीच्या आशिया कप मधील दमदार कामगिरी नंतर चांगलाच फॉर्मात आला आहे. उद्या ( 5 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस असतो. यावर्षी विराट कोहली त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर कोहलीच्या जगभरातील चाहत्यांनी त्याच्यासाठी मोठ्या गिफ्ट चे नियोजन केले आहे.
पत्नीला कार शिकवण्याचा नादात शिक्षकाचा संसार उध्वस्त! कार विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व उत्कृष्ट फलंदाज आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात देखील त्याचे चाहते आहेत. इतर क्रिकेटपटूंच्या तुलनेत त्याचे सोशल मीडियावर देखील प्रचंड चाहते आहेत. याच चाहत्यांनी कोहलीच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर नवीन ट्रेंड सुरू केला आहे.
सोमेश्वर कॉलेजला दिलेले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याची मागणी; शेतकरी कृती समितीने घेतला आक्षेप
#KingKohliBirthdayCDP हा हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांच्या प्रोफाइलवर एकसारखाच फोटो DP ला असला पाहिजे हा या हॅशटॅग चा अर्थ आहे. या हॅशटॅग मधील CDP म्हणजे common display picture असे म्हणता येईल.
पोरांना नादी लावणाऱ्या गौतमीने आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी; वाचा सविस्तर
आपल्या खेळाने आणि स्टाईलने चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीसाठी हे गिफ्ट नक्कीच आनंद देणारे असणार आहे. त्याचा हा 34 वा वाढदिवस नक्की कसा साजरा होणार, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ खतांवर मिळणार अनुदान; वाचा सविस्तर