
मुंबई (Mumbai) मधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान शरद पवार हे शिर्डीतल्या शिबीरातून येऊन पुन्हा एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे शरद पवारांना नक्की काय झाले आहे हे जाणून घेण्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
राजू शेट्टी शरद पवारांवर भडकले! शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा केला आरोप
शिर्डीला (Shirdi) कार्यकर्ता शिबिरासाठी शरद पवार (Sharad Pawar) गेले त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांची टीम देखील होती. ते शिर्डीवरून परत येताच रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.
विठ्ठला…बळीराजाला सुख समृद्धी दे…!, आ.बबनराव पाचपुते यांचे विठ्ठल चरणी साकडे
शरद पवारांच्या डॉक्टरांनी त्यांच्या तब्बेतीबद्दल माहिती दिली आहे. यावेळी डॉक्टर म्हणाले की, ” शरद पवार यांच्यावर न्यूमोनियासाठी उपचार सुरू आहेत. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे.” त्याचबरोबर “साहेब सध्या प्रकृती आणि राजकीय लढा देत आहेत. त्यांना थोडा ताप देखीलआला आहे”, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिलीये.
क्रिकेट विश्वात सुरवात? लहान वयात वडिलांचे निधन; वाचा विराट कोहलीच्या जीवनातील काही किस्से