बिबट्याने (Leopard) हल्ला करून एका शेतकऱ्याला जागीच ठार केले आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन (Virur Station) वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिंचोली बीट क्रमांक १४१ मध्ये घडली आहे. या घटनेने तेथील आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
आलिया-रणबीर झाले आई-बाबा, छोट्या चिमुकलीचं आगमन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा घुलोत असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भीमा घुलोत शेतात काम करता असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पठ्ठयाने युट्युबवर व्हिडिओ पाहून सुरू केला ‘हा’ व्यवसाय; कमावतोय लाखो रुपये
या घटनेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी तेथे पोहचले. आता या घटनेचा पुढील तपास वन विभाग (Forest Department) करत आहे.