कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत टीका केली आहे. याआधी देखील खूपदा त्यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. परंतु, यावेळी अगदी मर्यादा सोडून टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाला आहे. सत्तारांनी माफी मागितली पण तरी देखील हा वाद कमी झाला नाही. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर यांनी एक आवाहन केलं आहे.
मोठी बातमी! वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती
अब्दुल सत्तर महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी असूद्यात त्या ठिकाणी जाऊन त्यांचे कपडे फडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचे बक्षीस देईन, असं रेखा तौर म्हणाल्या आहेत.
श्रीगोंद्यात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध!
त्याचबरोबर अब्दुल सत्तरानी फक्त माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अब्दुल सत्तरच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
मोठी बातमी! कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत भीषण आग
त्याचबरोबर रेखा तौर पुढे म्हणाल्या की, सत्तारांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांनी हा अपमान फक्त सुप्रिया ताईंचाच नाही केला तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा केला आहे. अब्दुल सत्तार, तुला मी सांगू इच्छिते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुझ्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. असं देखील त्या म्हणाल्या आहेत.