त्रिदल अँकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अग्निविरमध्ये निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्रिदल अँकॅडमीमध्ये सत्कार करण्यात आला. यामध्ये एकूण नऊ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
येत्या चार दिवसात जनावरांचे बाजार होणार सुरु! पशुसंवर्धन विभागाने दिली माहिती
योगेश घोडके, सनी म्हस्के, तुषार पवार, राहुल उदमले, प्रवीण गावडे, प्रमोद गावडे, अर्जुन धोत्रे, शैलेश जगताप, रफिक पठाण या विद्यार्थ्यांची अग्निविरमध्ये निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम त्रिदल अँकॅडमी हिरडगाव फाटा या ठिकाणी पार पडला.
गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
या कार्यक्रमावेळी त्रिदल अँकॅडमीचे संस्थापक मेजर उद्धव खामकर, कर्जत पोलीस स्टेशनचे पीआय गावित साहेब , दक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप, चांडगावचे सरपंच रवींद्र म्हस्के, घोडेगावचे सरपंच रामदास घोडके, नाना सोनवणे, दत्ता दरेकर, राजू भुजबळ, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र खामकर, काजल काकडे मॅडम, वोहळ मावशी, इत्यादी उपस्थित होते.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर माहिती