राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ ( Bharat Jodo Yatra) अनेकांची मने जिंकत आहे. या यात्रेत ते लहानांपासून-थोरांपर्यंत सर्वांशी संवाद देखील साधत आहेत. या दरम्यान संवाद साधत असताना नांदेड येथे एका मुलाने राहुल गांधी यांच्यासमोर सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायची इच्छा बोलून दाखवली. यावेळी या मुलाला भेट म्हणून लॅपटॉप देण्यात आला आहे.
काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश
झाले असे की, यात्रेदरम्यान राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी सर्वेश हाटने या लहान मुलाला मोठेपणी काय व्हायचे आहे ? असा प्रश्न विचारला. यावेळी सर्वेशने सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहे असे सांगितले. मात्र यानंतर राहुल गांधी यांनी सर्वेशला आजपर्यंत कधी संगणक पाहिला आहेस का ? असे विचारताच सर्वेशने नाही असे सांगितले. इतकेच नाही तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा संगणक नसल्याची माहिती त्याने यावेळी दिली.
सरकारची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणणार
म्हणून आज राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत सर्वेश हाटने ( Sarvesh Hatne) या मुलाला लॅपटॉप भेट देण्यात आला आहे. या लॅपटॉप ने फक्त एका मुलाच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. परंतु, हिंदुस्थानातील प्रत्येक मुलाचे स्वप्न आम्हाला साकारायचे आहे. अशी भावना राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोरोना काळात अनेक विद्यार्थी संगणक नसल्याने शिक्षणापासून ( Education) वंचित राहिले, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.