मुंबई : सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. राजकीय वर्तुळात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात मोठ्या प्रमाणात एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल होत असतो. आता त्यांच्यातील वाद वाढतच चाललेले आहेत.
निलेश राणे हे (Nilesh Rane) नारायण राणेंचे पुत्र असून सध्या त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. याबाबत निलेश राणेंनी एक ट्विट केले आहे. निलेश राणेंनी “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!” अश्या आशयाचं ट्विट त्यांनी केले आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर अतिशय गंभीर आरोप केले होते. “सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं” अस वक्तव्य करत दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर आरोप केले होते.
दरम्यान, दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना आवरावं अस वक्तव्य भाजप नेते राजन तेली यांनी केलेले आहे.