बदल हा काळाचा नियम आहे. काळ बदलत जातोय तशी प्रत्येक गोष्टीत आधुनिकता येत आहे. शेती व्यवसायात सुद्धा आता आधुनिकता पहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर आधुनिक व व्यवसायिक पिके घेत आहेत. फळशेती, फुलशेती व इतर नगदी पिकांचे उत्पादन यामुळे शेती व्यवसायातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होत आहे. यामुळे महाराष्ट्रात फळबाग लागवडीचे ( Fruit Farming in Maharashtra) प्रमाण वाढलेले दिसत आहे. पुण्यातील भोर मधील एका शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची बाग फुलवली आहे.
लहान मुलाच्या स्वप्नपूर्ती साठी राहुल गांधींचा पुढाकार; इंजिनीअर व्हायचे म्हणताच दिली लॅपटॉपची भेट!
संदीप शेटे या प्रयोगशील शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी हार्मोन ९९ या सफरचंद जातीच्या १५ रोपांची १५ बाय १५ अंतरावरती रोपांची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश येथून या शेतकऱ्याने ही रोपे आणली होती. आता ही झाडे चांगलीच वाढली असून त्यांना फळे देखील यायला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदीप यांनी ही संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. त्यांच्या एका सफरचंदाच्या झाडाला 25-30 फळे लागली आहेत. काश्मीर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकविले जाणारे हे फळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या ( Modern technology) जोरावर महाराष्ट्रात देखील पिकवले जाऊ शकते. असे संदीप शेटे यांनी सांगितले आहे.
धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता प्रसाद ओकने दिली माहिती
याआधी महाराष्ट्रातील खटाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी मानसिंगराव माळवे यांनी देखील सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग केला होता. त्यांनी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर दुष्काळी भागात पुसेसावळी (ता.खटाव) या ठिकाणी अगदी माळरानावर सफरचंदाची बाग फुलवली आहे. खटाव हा दुष्काळी भाग आहे व येथील तापमान उन्हाळ्यात 40 ℃ चया वर असते. येथे पाण्याची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. तरी देखील माळवे यांनी पश्चिम महाराष्ट्रात सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
काटामारीला बसणार आळा; साखर आयुक्तांनी कारख्यान्यांना दिले ‘हे’ आदेश