बस (bus) स्थानकातून बस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वाना एकच प्रश्न पडला आहे. बस डेपोसून एसटी बस कशी काय चोरीला जाऊ शकते? हो ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील देऊळगाव राजा बस स्थानकात घडली आहे. मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने चक्क एसटी बसच पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाची बातमी! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये; वाचा सविस्तर
आता याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या एसटी बस चोरीची संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. परवा मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने बस चोरली. पण ही बस देऊळगाव राजा ते चिखली मार्गावर आढळून आली असून या बसचा ब्रेकवर सेंट्रल जॉईंट तुटला आणि त्यामुळे बस नादुरुस्त झाली. त्यामुळे बस चोरुन नेणाऱ्या अज्ञात व्यक्तीला बस तिथेच सोडून जावे लागले.
ब्रेकिंग! सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे निधन
याप्रकरणी पोलिसांनी (Police) घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास चालू केला आहे. सध्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू