चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पातीने त्याच्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडवल्याची धक्कदायक घटना घडली आहे. नागभीड तालुक्यातील ढोरपा गावामध्ये ही घटना घडली आहे.
सर्वसामान्यांसाठी दिलासदायक! खाद्यतेलाचे भाव उतरले…
घटना अशी घडली की, महिला शेतामध्ये काम करत असताना तिच्यावर अचानक वाघाने हल्ला केला. महिला शेतातील धानाच्या ओंब्या वेचत होत्या. व त्यांचे पती बाजूच्या शेतात गवत कापत होते. याचवेळी संधी साधून दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताच महिलेने मोठमोठ्याने आरडाओरडा केला.
रोहित पवारांचा विरोधकांना दिला इशारा; म्हणाले,”…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”
महिलेचा आरडलेला आवाज एकूण त्यांचे पती लगेच धावत आले. त्यावेळी वाघाने फरपटत महिलेला चालवले होते. यावेळी पतीने कुऱ्हाड घेऊन वाघाच्या दिशेने धाव घेतली. यामुळे वाघाचे लक्ष विचलित झाले आणि तो जखमी महिलेला तिथेच टाकून निघून गेला. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अरे बापरे! चक्क बस स्थानकातून एसटी बस गेली चोरीला; वाचा सविस्तर