नाशिकमधून (Nashik) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये दहा महिन्यांच्या चिमुकलीवर गरम पाणी (hot water) सांडलं आणि त्यात ती प्रचंड होरपळली. असून तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकलीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसला आहे. नाशिकमधील गंगापूर नाका भागात ही घटना घडलीमी आहे.
आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा
या चिमुकलीला अंघोळ घालण्यासाठी गरम पाणी बाथरुममध्ये काढून ठेवण्यात आले. हे पाणी त्या चिमुकलीच्या अंगावर सांडलं आणि अनर्थ घडला. अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे चिमुकली प्रचंड भाजली. तीच शरीर गंभीररीत्या जखमी झालं. तिला रुग्णालयात ताबोडतोब दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये तीन दिवस तिच्यावर उपचार देखील झाले. पण शेवटी त्या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला.
कुत्र्याला लागला पाणीपुरी खाण्याचा नाद! पाहा व्हायरल व्हिडीओ
चिमुकलीच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खुशखबर! शेतकऱ्यांना निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर; ‘असा’ करा अर्ज