मोठी बातमी! अज्ञात आंदोलकांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला

Big news! Unidentified protesters set a tractor full of sugarcane on fire

राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (swabhimani shetkari sanghtna) ऊस उत्पादकांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी केली आहे. यासाठी आज आणि उद्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

हृदयद्रावक! १० महिन्याच्या चिमुकलीचा अंगावर गरम पाणी सांडून मृत्यू

यामुळे ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज आणि उद्या स्वाभिमानीने ऊसतोड बंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, या आंदोलनावेळी दोन दिवसात जर कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होणार असल्याचा गंभीर इशारा राजू शेट्टीं यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी अनेक मागण्यांची मागणी होणार आहे. त्यामध्ये ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठीचा कायदा मंजूर करावा, त्याचबरोबर एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ देखील करावी या मागण्या असणार आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात आज आणि उद्या आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलन करून प्रश्न सुटले नाहीत तर १८ तारखेपासून काय करायचे ते सांगतो; राजू शेट्टींचा गंभीर इशारा

दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले आहे. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवल्याची घटना घडली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

कुत्र्याला लागला पाणीपुरी खाण्याचा नाद! पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *