बारामती तालुक्यात ऊसतोड कामगाराच्या ३ वर्षीय चीमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला…

A stray dog ​​fatally attacked a 3-year-old child of a sugarcane worker in Baramati taluka

कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या २ वर्षीय चिमुकल्याच्या तोंडाचा चावा भटक्या कुत्र्याने घेतला आहे. यात मुलाचा पूर्ण जबडा व ओठ फाटले असून त्यावर ५५ टाके घालत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. युवराज राठोड असं २ वर्षीय मुलाचे नाव आहे.

बिग ब्रेकिंग! मंत्रालयामध्ये तरुणाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न; नेमकं काय असेल कारण?

पाथर्डी येथून सध्या ऊसतोडणी कामगार सध्या सोमेश्वर साखर कारखान्याकडे आले होते. संध्याकाळच्या सुमारास ऊसतोडणी कामगाराचा २ वर्षीय मुलगा युवराज राठोड कोप्यावर खेळत असताना, भटक्या कुत्र्याने त्याचावर जीवघेणा हल्ला करत पूर्ण ओठ व जबडा फाडून काढला.

“राहुल गांधींचा विचार गाडल्याशिवाय राहणार नाही” – देवेंद्र फडणवीस

हा हल्ला इतका भयानक होता कि बालकाला तत्काळ रुग्ण्यालयात हलवण्यात आले व तब्बल ५५ टाके घालून शस्त्रक्रिया करण्यात आली. युवराजचे वडील हे कामगार असल्यामूळे त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे न्हवते, मात्र डॉक्टरांनी माणुसकी जपत शस्त्रक्रिया, तसेच सर्व गोळ्या- औषधे याचा खर्च स्वता:च्या खिशातून करत सामाजिक बांधिलकीचा एक नवा संदेश समाजाला दिला आहे.

‘सुषमा अंधारे तुम्ही आडनाव बदलून सुषमा आगलावे करा’ – आशिष शेलार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *