ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन होणार – राजू शेट्टी

As the government has not taken a decision despite banning sugarcane cutting, there will be Chakkajam protest across the state on November 25 - Raju Shetty

राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (swabhimani shetkari sanghtna) ऊस उत्पादकांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी केली आहे. यासाठी दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले. पण दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सीताफळाचे दर भिडले गगनाला; सफरचंदापेक्षा जास्त मिळतोय भाव

राजू शेट्टींनी २५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. 100 खोके घालून देखील सरकार येऊ देणार नाही, असा गंभीर इशारा देखील त्यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावर देखील आंदोलन केलं जाणार आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी म्हणाले, अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू.

धक्कादायक! तंबाखू खाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने घेतला आईचा जीव

त्याचबरोबर राजू शेट्टी पुढे म्हणाले, आम्ही दोन दिवस आंदोलन करून देखील सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांनी चर्चेलाही बोलावलं नाही, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता वेठीला धरणारं आंदोलन कराव लागणार आहे. दोन महिने झाले आम्ही मागण्या मांडत आहोत पण दुर्दैवाने राज्य सरकार याची कोणतीही दखल घेत नाही.

Unknown नंबर ऐवजी दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *