
आजकाल गायी-म्हशींच्या (Cows and buffaloes) दुधामध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता सध्या एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हशींची दूध क्षमता वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन (oxytocin) इंजेक्शन दिल्याप्रकरणी पुणे आणि आसपासच्या परिसरातील एकूण सहा दूध उत्पादकांना अटक करण्यात आली आहे.
हे इंजेक्शन वापरणाऱ्या अजून काही शेतकऱ्यांचीही ओळख पटली असून, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका शेतकऱ्याचे 50 हून अधिक म्हशींचे मोठे डेअरी फार्म देखील आहे.
सीताफळाचे दर भिडले गगनाला; सफरचंदापेक्षा जास्त मिळतोय भाव
दरम्यान, या औषधावर केंद्र सरकारने (Central Govt) २०१८ साली बंदी घातलेली आहे. बंदी घालूनही दूध उत्पादक याचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता या दूधउत्पादकांविरोधात कठोर कारवाई होणार आहे.