चंपक चाचांचा अपघात; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे चित्रीकरण थांबले

Accident of Champak Chacha; The shooting of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma' has been halted

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta ka Ulta Chashma) ही छोट्या पडद्यावरील अबालवृद्धांच्या आवडीची जुनी मालिका आहे. एक दशक पूर्ण झालेली ही मालिका आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. इतकंच नाही तर या मालिकेतील पात्रे देखील लोकांना आपलीच वाटतात. या पत्रांचा एक वेगळाच चाहतावर्ग पहायला मिळतो. कौटुंबिक व सामाजिक विषय हाताळणारी ही मालिका अगदी विनोदी पद्धतीने दाखवली गेल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील ‘चंपक चाचां’ ( Champak Chacha) बद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कुठलाच क्लास न लावताच झाली आयएएस अधिकारी; वाचा कृषीकन्येची यशोगाथा

मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान चंपक चाचांना म्हणजेच अमित भट्ट दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका महत्त्वाच्या सीनचे चित्रीकरण करत असताना अभिनेते अमित भट्ट यांना धवायचे होते. परंतु, धावताना ते अचानक पडले व त्यांचा छोटा अपघात झाला. यामुळे त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे.

सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी

अमित भट्ट ( Amit Bhatt) यांच्या या अपघातामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या चित्रीकरणात खंड पडला आहे. यामुळे चंपक चाचांना आराम मिळावा म्हणून चित्रीकरणातून ब्रेक दिला असला तरी निर्माते चांगलेच काळजीत आहेत. आता चाहत्यांना देखील ही माहिती समजली असल्याने चाहते सुद्धा अमित भट्ट यांच्यासाठी काळजीत आहेत.

धक्कादायक! आफताबच्या २५ गर्लफ्रेंड्स असल्याची माहिती आली समोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *