शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. ‘पीएम किसान योजना’ (PM Kisan Yojana) ही केंद्रसरकारच्या अनेक महत्त्वाच्या योजनांमधील एक योजना आहे. देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. यासाठी दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. परंतु दिवसेंदिवस या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी
त्याच झालंय अस की, पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 11 कोटी 19 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. तर याच योजनेचा 12 वा हप्ता फक्त 8 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. खरंतर लाभार्थ्यांच्या संख्येत ही एवढी मोठी तफावत येण्यामागे देखील मोठ कारण आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ई-केवायसीच्या (E-KYC) निर्बंधामुळे अनेक नवीन लाभार्थ्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच या योजनेचा लाभ योग्य त्या व्यक्तीलाच व्हावा यासाठी सरकारने काही अटी व नियम (Rules and Regulations) लागू केले आहेत. खालील लोकांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.
भूक कंट्रोल न झाल्याने हत्तीने खाल्ले चक्क…; पाहा व्हिडीओ
1) सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त लोक शेती करत असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
2) कुटुंबात कर्जदार व्यक्ती असल्यास योजनेतून वगळण्यात येते.
3) कोणत्याही शासकीय पदावर असलेला व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
4) नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांच्याकडे शेतीची मालकी असली तरी ते या योजनेचे लाभार्थी होऊ शकत नाहीत.
5) ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही.
संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता