गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. गरजेनुसार माणूस नवनवीन बदल घडवून आणत आहे. आपले जीवन अधिक सुखकर व समृद्ध होण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. काही वर्षांपूर्वी खरेदीसाठी माणसाला बाजारात जावे लागत होते. परंतु आता माणूस घरच्याघरी एका क्लिकवर हवी ती गोष्ट मागवत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, नुकतेच एक अॅप तयार झाले आहे ज्यामध्ये गायी म्हशींची ऑनलाइन विक्री देखील होऊ शकते.
एका व्यक्तीला ऑनलाईन हॉटेल बुक करण पडलं महागात; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाला (Animal Husbantry & Dairy Farming) प्रोत्साहन देण्यासाठी हे अॅप बनवण्यात आले आहे. अॅनिमल अॅप्लिकेशन (Animal.in) असे या अॅप चे नाव आहे. या अॅपद्वारे पशुपालनासंदर्भात खालील सोयी उपलब्ध असणार आहेत.
1) 0 ते 18 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या जनावरांची माहिती.
2) प्राणी खरेदी आणि विक्री.
3) प्राणी उपचार.
4) प्राण्यांची सुविधा.
बिग ब्रेकिंग! अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
हे अॅप मोबाईल मध्ये घेण्यासाठी https://animall.in/ या लिंकवरून अॅप डाउनलोड करा. यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. पुढे माहितीमध्ये तुमच्या गावचे किंवा शहराचे नाव व त्यासोबत पिनकोड टाकावा लागेल. अन्यथा मोबाईलचे लोकेशन ऑन करावे लागेल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पशुपालन संदर्भात हवी ती माहिती उपलब्ध होईल.
अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न