छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्रासाठी व्यक्ती नाही तर भावना आहे. शिवाजी महाराजांच्या रयतेविषयक धोरणांची व योजनांची कायम चर्चा होत असते. सर्वच गोष्टींचे सुयोग्य व्यवस्थापन व नियोजन यामुळे शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ असे देखील म्हंटले जाते. शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण तर आजच्या काळासाठी देखील आदर्श आहे.
कोटींच्या घरात फायदा करून देणारे ‘हे’ झाड तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर
शेती ही रयतेच्या आर्थिक उत्पादनाचे मुख्य साधन आहे हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे शेती पिकली तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राजा सुखी हे महाराजांनी जाणून घेतले होते. आजही शिवचरित्रामध्ये ( Shiv charitra) शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचे अनेक दाखले मिळतात.
चक्क अजगराने केला बिबट्यावर हल्ला; दोघांची लागली झुंज
कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे इथपासूनचे पत्रक शिवाजी महाराजांनी ( Shivaji Maharaj) तयार केले होते. त्याकाळी शेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती.ज्यामध्ये नांगरणी , कोळपणी केली जात असे. इतकंच नाही तर त्यावेळी केली जाणारी शेती ही फक्त शेणखतावर केली जात असे. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) जे सेंद्रिय शेतीचे धोरण भारतात अवलंबविण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शिवाजी महाराजांनी कित्येक शतकांपूर्वी अवलंबिवले होते.
अरे बापरे ‘या’ ठिकाणी मोठा चमत्कार! चार पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा झाला जन्म
यावरूनच महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो याबाबत शिवाजी महाराजांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी कधीच शेतकऱ्यांकडून शेतसारा ( Tax) वसुल केला नाही. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी जमीन मोजणीसाठी एक उत्तम प्रणाली देखील बनवून ठेवली होती.