शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार नेहमीच आपल्या आजूबाजूला घडत असतात. परभणी ( Parbhani) येथील एका विमा कंपनीकडून ( Insurance Policy) देखील सध्या शेतकऱ्यांना फसवले जात आहे. खरीप हंगामात झालेल्या पिकांचे नुकसान म्हणून अगदी कमी रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्याचा प्रकार येथे घडला आहे.
चक्क गॅसवर मिळते 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण; वाचा सविस्तर
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यांना सध्या विमा कंपनीकडून पैसे वाटप करण्यात येत आहे. परंतु, ही रक्कम 1 रुपया 70 पैसे, 74 रुपये अशा स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच हावलदाराला मारहाण; व्हिडिओ होतोय व्हायरल
या खरीप हंगामात ( Kharip Season) परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडे पीक विमा भरला होता. यामध्ये तब्बल 6 लाख 71 हजार 573 शेतकऱ्याचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी सुमारे 48 कोटी 25 लाखांचा विमा भरला होता. यामधून 4 लाख 38 हजार 812 हेक्टर एवढे पीक क्षेत्र संरक्षित केले होते.
आनंदाची बातमी! कापसाला मिळतोय चांगला भाव; आणखी दर वाढण्याची शक्यता
मात्र, विमा कंपन्यांनी विम्याची अगदी कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी विमा कंपन्यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करावी असा इशारा दिला होता. यामुळे सरकार विमा कंपन्यावर कारवाई करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.