अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध व हुशार अभिनेत्री समजली जाते. काही महिन्यांपूर्वी तिचा पती राज कुंद्रा याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. उद्योगपती असलेल्या राज कुंद्राच्या (Raj Kundra) विरोधात आता पोर्नोग्राफी प्रकारणात ( Pornography) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामुळे शिल्पा शेट्टीवर मोठे संकट आले आहे.
Milk Price: ‘या’ डेअरीने दुधाच्या दरात केली वाढ; वाचा सविस्तर
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून यासंदर्भात 450 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात शर्लिन चोप्रा, राज कुंद्रा व पूनम पांडे यांनी अश्लील कंटेंट बनवून ओटीटी वर अपलोड केल्याचा मुख्य आरोप करण्यात आला आहे. एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रांचने ( Mumbai Crime Branch) आरोपपत्र दाखल केले होते.
एकतर्फी प्रेमातून तरुणाने उचलले मोठे पाऊल; स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी
2021 च्या फेब्रुवारी मध्ये एका बंगल्यावर छापेमारी करत असताना या अश्लील रॅकेट ( porn racket) बद्दल पोलिसांना भनक लागली. यानंतर जुलै 2021 मध्ये राज कुंद्राला यासंदर्भात अटक करण्यात आले होते. एप्रिल 2021 मध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले.
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; शेतकरी आक्रमक
मात्र सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रा जामिनावर अटकेतून बाहेर पडला आहे. तेव्हापासून तो मीडियासमोर आला नसून सध्या महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ( Maharashtra Cyber Police) गुन्हा दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.