थेट ऊसवाहतूकदारांना चोप देण्याचा इशारा; अपघात टाळण्यासाठी ‘या’ गावाची अनोखी शक्कल

A unique initiative to prevent accidents in Kashti village in Srigonda; Warning to sugarcane transporters

सध्या बहुतेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या गाड्या आपल्या आजूबाजूला दिसायला लागल्या असतील. हे ऊस वाहतूकदार अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असतात. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. यामुळे अहमदनगर येथील श्रीगोंदामधील काष्टी गावात एक अनोखा उपक्रम राबविला आहे.

Viral Photo: विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने गुपचूप केलं लग्न?

काष्टी ( Kashti) ग्रामपंचायतीने ऊस वाहतुकचालक व इतर लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नवे पाऊल उचलले आहे. या ग्रामपंचायतीने गावाच्या परिसरात वाहतूकदारांना इशारा देणारे फलक लावले आहेत. या फलकावर लाल आणि मोठ्या अक्षरात वॉर्निंग! वॉर्निंग! वॉर्निंग! ( Warning flex for sugarcan transpoters) असे लिहिले आहे.

बिग ब्रेकिंग! नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; दोन दिवसांपासून येत आहेत मेसेज

याशिवाय या फलकावर आणखी काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यतः मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर चालू असणे, फास्ट स्पीड असणे, रिफ्लेक्टर व रेडियम पडदा नसणे असा ट्रॅक्टर व ट्रॉली आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल अथवा चालकाला चोप दिला जाईल अशी सूचना दिली आहे.

नवले पुलावरच्या अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

काष्टी हे गाव महामार्गावर (village on Highway) आहे. दरवर्षी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होते. श्रीगोंदामध्ये चार कारखाने असून दौंड ( Daund) मध्ये दोन कारखाने आहेत. ही दोन्ही ठिकाणे काष्टी पासून जवळ असल्याने. या महामार्गावरून जास्त प्रमाणात ऊस वाहतूक होते. यामुळे या गावाने ही उपाययोजना केली आहे.

मानसी नाईकच्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *