मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती तिच्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. आलीया प्रेग्नेंट असल्यामुळे ती आता कायम चर्चेत असते. सध्या आलिया तिच्या डार्लिंग चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान तिने रणबीर कपूरसोबतच्या (Ranbir Kapoor) तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये आलिया म्हणाली, “रणबीरने नेहमीच माझी चांगली काळजी घेतली आहे. तो माझ्या पायाची मसाज देखील करतो. तो अधिक काळजी घेणारा झाला आहे. पण मला खास वाटण्यासाठी तो खूप काही करतो. आता तो आणखी काय करू शकतो?”.
आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया तिचा पती रणबीर सोबत आगमी चित्रपट ब्रम्हास्र मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.